Monday, August 31, 2009

चेहरे आणि मित्र

म्हणजे अशी काय थ्रेशोल्ड लाइन असते की त्यानंतर ओळखीचे लोक मित्र किंवा मैत्रिणी होतात . आता ओर्कुट वर माझे 686 मित्र आहेत . पण ते खरच मित्र आहेत का माझे .. का फक्त ओळखीचे चेहरे आहेत ... मेंदू मधल्या नोंदी.. म्हणजे मैत्री च्या असंख्य व्याख्येमधली अधिक प्रॅक्टिकल कोणती
जो आपल्याला वाढदिवसाला फोन करतो , असाच आठवण आली तर पिंग करतो.. आयुष्यातल्या काही गोष्टी त्याच्या समोर नागाडया करता येतात कसं ठरवणार ?काय ...?
मला वाटत या व्याख्येत पडु नये कारण हे नातं असं डिफाइन करताच येणार नाही. रक्ताच सोडलं तर कुठल्याच नात्याला बाउंड्री नाहीए . होऊ देत ओळखीचे चेहरे मित्र आणि मित्रांचे परत नुसते चेहरे...........

No comments: