Sunday, October 12, 2008

कशासाठी पोटासाठी ...

आज मला अर्धवट काहीतरी वाटतय की आपल्याला एवढा पैसा का मिळतो , किंवा अस काय जगावेगला आपण करतो म्हणुन आपल्याला एवढा पैसा मिळावा.. माझ्या मेहनतीची किम्मत एवढी का आहे, .. बाहेरच्या जगात बघितला की कळत, मेंटल वर्क मनी अणि फिजिकल वर्क मनी हा ratio केवढा भयंकर आहे.. सामाजिक विषमता वगैरे भाग सोडा , पण खरच प्राथमिक खर्च जाता , कितीतरी पैसा आज आपल्या हातात आहे . आणि हे दोनिही समाज एकत्र एकाच शहरात नांदत आहेत . सामाजिक अस्थिरता आहे कारण तासागानिक जो मोबदला मिळतो त्याचे वाटप!!
आज सगळ्या आईटी Engineers चे पगार निम्मे केले तर मला नाही वाटत की कोणावर मरण संकट ओढावेल.. पण हेच physical workers च्या बाबतीत नाहीये.