Monday, August 31, 2009

Innocence

काल प्राज कडे गेलो होतो त्याच वोडेफोन च्या आड मधला कुत्र बघायला . खूप इनोसेंट होत ते.. ते आपला उड्या मारत होत . मला एकदम वाटल की आपल्याला इनोसेन्स किती आवडतो. त्या कुत्र्याला समजत नव्हत की आपण काय वागतोय , चाटतोय .आपण वेड्या सारख त्याच्या त्या लीला पाहत असतो. नक्की का आवडत आपल्याला.? कुठे जातो हा इनोसेन्स नंतर.... म्हणजे त्याच्या वागण्याला काही सूत्र नव्हत..म्हणून आवडतात वाटत लहान मुलं , कुत्री वगैरे . एका ठराविक वयानंतर आपण ठराविक वागतो . रीत येते. आणि आपण आपली निरागसता घालवतो . कोणी डिफाइन करेल का इनोसेन्स काय असतो..

No comments: